वापरकर्त्यांना या भाषांपैकी एक सहजपणे निवडण्याची अनुमती देऊन, सार्वजनिक सत्रासाठी एक किंवा अधिक शिफारस केलेल्या भाषा सेट करते.
सार्वजनिक सत्र सुरु करण्यापूर्वी वापरकर्ता एक भाषा आणि एक कीबोर्ड लेआउट निवडू शकतो. डीफॉल्टनुसार, Google Chrome OS द्वारे समर्थित असलेल्या सर्व भाषा वर्णक्रमानुसार सूचीबद्ध केल्या जातात. शिफारस केलेल्या भाषांचा संच सूचीच्या शीर्षस्थानी हलविण्यासाठी आपण हे धोरण वापरू शकता.
हे धोरण सेट न केल्यास, वर्तमान UI भाषा ही आधी-निवडलेली असेल.
हे धोरण सेट केले असल्यास, शिफारस केलेल्या भाषा सूचीच्या शीर्षस्थानी हलविल्या जातील आणि इतर सर्व भाषांपासून दृश्यमानपणे वेगळ्या केल्या जातील. शिफारस केलेल्या भाषा ज्या क्रमात धोरणामध्ये दिसतात त्याच क्रमात सूचीबद्ध केल्या जातील. प्रथम शिफारस केलेली भाषा ही आधी-निवडलेली असेल.
एकापेक्षा अधिक शिफारस केलेल्या भाषा असल्यास, वापरकर्ता या भाषांमधून निवडू इच्छित असेल हे गृहित धरले जाते. सार्वजनिक सत्र प्रारंभ करताना भाषा आणि कीबोर्ड लेआउट निवड प्रामुख्याने ऑफर केली जाते. अन्यथा, बहुतांश वापरकर्ते आधी-निवडलेली भाषा वापरू इच्छित असतील हे गृहित धरले जाते. सार्वजनिक सत्र प्रारंभ करताना भाषा आणि कीबोर्ड लेआउट निवड कमी महत्त्व देऊन ऑफर केली जाते.
हे धोरण सेट केले असते आणि स्वयंचलित लॉगिन सक्षम केले असते तेव्हा (| DeviceLocalAccountAutoLoginId| आणि |DeviceLocalAccountAutoLoginDelay| धोरणे पहा), स्वयंचलितपणे प्रारंभ केलेले सार्वजनिक सत्र प्रथम शिफारस केलेली भाषा आणि या भाषेशी जुळणार्या सर्वाधिक लोकप्रिय कीबोर्ड लेआउटचा वापर करेल.
आधी-निवडलेले कीबोर्ड लेआउट हे नेहमी आधी-निवडलेल्या भाषेशी जुळणारे सर्वाधिक लोकप्रिय लेआउट असेल.
हे धोरण केवळ शिफारस केलेले म्हणून सेट केले जाऊ शकते. आपण या धोरणाचा वापर शिफारस केलेल्या भाषांचा संच शीर्षस्थानी हलविण्यासाठी करू शकता परंतु वापरकर्त्यांना त्यांच्या सत्रासाठी Google Chrome OS द्वारे समर्थित असलेली कोणतीही भाषा निवडण्याची नेहमी अनुमती असते.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\Recommended\SessionLocales |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |